‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी एका गोष्टीवर नेमकं बोट ठेवते - मुस्लिमांच्या समस्यावर... जे सामाजिक कार्यकर्ते सोयीस्कररीत्या मौन बाळगतात त्याच्यावर...
या कादंबरीचं कथानक कोल्हापुरातील एका छोट्या मुस्लीम मोहल्यात घडतं. तिथं राहणारे मुस्लीम लोक रूढीग्रस्त, अशिक्षित तर आहेतच, त्याचबरोबर मुस्लीम मौलवी आणि धर्मगुरूंचा जबरदस्त पगडा असलेला असा हा मोहल्ला आहे. बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावल्यानंतर जी धरपकड होते, त्यात या मोहल्यातील दोन तरुण मुलांना पोलीस पकडून नेतात. अशा कथानकानं या कादंबरीची सुरुवात होते. पहिल्या १०-१५ पानांतच ही कादंबरी वाचकांच्या मनाची पकड घेते.......